घटस्फोट: मानसशास्त्रीय दृष्टीकोन१. प्रस्तावना व कारणे

आकडेवारी नुसार , आपल्या देशामध्ये घटस्फोटाचे प्रमाण तसे कमी आहे ( १% पेक्षा कमी) म्हणजे दर 1000 विवाहांमागे 13 विवाह घटस्फोटात रूपांतरित होतात.
गेल्या काही वर्षात घटस्फोटाच्या केसेस मध्ये दुपटीने वाढ झाली आहे. Arrange असो किंवा love marriage, घटस्फोटांच्या आकडेवारीमध्ये काही फरक नाही.
विवाह करणे सोपे आहे पण हे ऋणानुबंध आयुष्यभर निभावणे तितकेच अवघड.
व्यक्ती (वर , वधु व परिवार) लग्नबंधनात अवास्तव अपेक्षा घेऊन येतात. नव्याचे romantic दिवस समाप्त होताच जेव्हा संसार , मुले, संगोपण, financial planning , आजारपण इत्यादी वास्तविक प्रश्न निर्माण होतात तेव्हा या नात्याची खरी परीक्षा होते.
घटस्फोटाची काही सामान्य कारणे :

१) विसंगत जोडीदार
जगात कोणीही दोन व्यक्ती १००% अनुरूप (compatible) नसतात. दोन जोडीदारां मधील फरक व कमतरता जर परस्पर पूरक ( complimentary) करता आले तर संसार आयुष्यभर टिकतो.
पण जर दोन व्यक्ती मधील सांस्कृतिक मूल्ये , सामाजिक व धार्मिक दृष्टिकोन, लैंगिक विचार या मध्ये फार विसंगता असेल तर मतभेद अटळ आहेत

२. गैरसमज
नकारात्मक विचार पुढे नकारात्मक भावनांना जन्म देतात. नकारात्मक भावानंमुळे गैरसमज व नकारात्मक संवाद सुरू होतो. सर्व वादविवादांचे मूळ हे पूर्वग्रह व नकारात्मक संवाद आहे. हळूहळू ‘Taken for granted’ म्हणजे ‘गृहीत धरणे’ ही वृत्ती जोडप्यांमध्ये रुजत जाते.

३. व्यभिचार
विवाहसंस्था ही विश्वासावर टिकून आहे. एकदा जर कोणी फसवणूक केली तर हे नुकसान भरून न येणारे आहे. विवाहबाह्य संबंध कोणालाच मान्य नाही कारण जोडीदाराच्या प्रेमावर आपला संपूर्ण हक्क असतो. येथे चुकीला माफी नाही.

३. लैंगिक समस्या
लैंगिक सहवासाची कमतरता, नपुंसकता, कामवासनेचा अभाव असणे, न्यूनगंड इत्यादी २० ते ३० टक्के घटस्फोटांकरिता जबाबदार आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या पैकी बर्याच लैंगिक समस्यांवर खात्रीशीर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. लैंगिक संबंधमुळे नवरा बायको मधील भावनिक नाते अधिक भक्कम होते.

४. व्यसनाधीनता
दारू व अमली पदार्थांचे सेवन हे व्यक्ती , विवाह, समाज, देश सर्वांसाठी घातक आहे. व्यसनाधीनतेमुळे आर्थिक अस्थिरता व घरगुती हिंसेमध्ये वाढ होत आहे. पुरुष मंडळी मध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त आहे तसेच स्त्रियांमध्ये देखील हे प्रमाण वाढत आहे.

५. घरगुती हिंसाचार ( domestic violence)
घटस्फोटाचे समर्थन या एकाच कारणासाठी आपण करू शकतो. घरगुती हिंसेचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे. अशा ‘Toxic Relationship’ मध्ये आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा विभक्त होणे योग्य. पूर्वी स्त्रिया पुरुषांवर निर्भर असल्यामुळे , हा घरगुती हिंसाचार सहन करत .पण आता काळ बदलला आहे. बऱ्याच सामाजिक संस्था आज घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी कार्यरत आहेत.

आपल्या देशात दोन व्यक्ती नव्हे तर दोन परीवार विवाहबंधनात एकत्र येतात . काही वेळेस नाही पटले तर वादविवाद टोकाला जातात. नाते टिकवण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत ,पण जिथे नुकसान अटळ आहे तिथे ते कमीत कमी करण्याचे प्रयत्न असावेत. घटस्फोटित व्यक्तीला आयुष्य नव्याने उभारण्याची संधी मिळावी !!!

©
चेतन विसपुते
मानसोपचार तज्ञ
वाशी नवी मुंबई
7021553187
drchetanvispute@gmail.com

One thought on “घटस्फोट: मानसशास्त्रीय दृष्टीकोन१. प्रस्तावना व कारणे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s